पंतप्रधान मोदींनी सांगितलं फिटनेसचं 'रहस्य'; म्हणाले, 'रोज एक-दोन किलो शिव्या खातो!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:53 PM2018-04-19T12:53:31+5:302018-04-19T12:53:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.
लंडन- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. रोज एक-दोन किलो शिव्या खातो हेच माझ्या फिटनेसचं रहस्य असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. लंडनमधील टाऊनहॉलमध्ये प्रवासी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचा राज सांगितला.
लंडनमधील कार्यक्रमात एका श्रोत्याने नरेंद्र मोदींना त्यांच्या फिटनेसचं रहस्य विचारलं. त्यावर मोदी म्हणाले की, 'मी गेल्या 20 वर्षांपासून दररोज एक-दोन किलो शिव्या खातो आहे'. लोकांची टीका सकारात्कमपणे स्वीकारत असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. कार्यक्रमात 'शिव्या' हा शब्द उच्चारला जाताचं उपस्थितांनी गोंधळ करत मोदींच्या नावाने घोषणा दिल्या.
बुधवारी लंडनमधल्या वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर मत मांडली.
बलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोला
जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं राजकारण करू नका, या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोप झाले नाही पाहिजे. बलात्कारावर घटनेचं राजकारण होणं दुर्दैव आहे. आपण एका मुलीबरोबर अत्याचार कसं सहन करू शकतो, असं मोदी म्हणाले.