‘हुनर हाट’ला मोदींची भेट, चहासह विविध पदार्थांचा घेतला आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:30 PM2020-02-19T18:30:02+5:302020-02-19T18:31:29+5:30

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक भेट दिल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मात्र सर्वसामान्यांना पंतप्रधानांची भेट घेण्याची परवानगी होती.

Prime Minister Narendra Modi today visited Hunar Haat at India Gate | ‘हुनर हाट’ला मोदींची भेट, चहासह विविध पदार्थांचा घेतला आस्वाद

‘हुनर हाट’ला मोदींची भेट, चहासह विविध पदार्थांचा घेतला आस्वाद

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया गेट लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या हुनर हाट ला भेट दिली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रदर्शनाला अचानक भेट दिल्याने तिथे उपस्थित असलेले कारागिर आणि सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मोदींनी तिथे असलेल्या स्टॉल्सना भेट दिली. तसेच तिथे उपस्थित असलेले कारागिर आणि सर्वसामान्यांशी चर्चा केली. यादरम्यान, मोदींनी कुल्हडमधील चहाचा आणि बिहारमधील खास अशा लिट्टी-चोखाचा आस्वाद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक भेट दिल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मात्र सर्वसामान्यांना पंतप्रधानांची भेट घेण्याची परवानगी होती. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हेसुद्धा उपस्थित होते. कौशल को काम या थीमवर आधारित या प्रदर्शनात देशभरातील दस्तकार, शिल्पकार आणि आचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.

गत तीन वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून सुमारे ३ लाख दस्तकार, शिल्पकार आणि आचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी येथील प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत.  



आतापर्यंत हुनर हाटचे आयोजन मुंबई, प्रयागराज, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, हैदराबाद, पुदुच्चेरी आणि इंदूर येथे झाले आहे. दरम्यान, पुढील हुनर हाट २९ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान रांची आणि १३ ते २२ मार्च दरम्यान चंदिगड येथे आयोजित केले जाणार आहेत.  

Web Title: Prime Minister Narendra Modi today visited Hunar Haat at India Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.