पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही; टीडीपी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 06:07 PM2018-04-21T18:07:16+5:302018-04-21T18:07:16+5:30
तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत शनिवारी वादग्रस्त विधान केले आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशद्रोही आणि नमक हराम असल्याचे म्हटले आहे.
विजयवाडा : तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत शनिवारी वादग्रस्त विधान केले आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशद्रोही आणि नमक हराम असल्याचे म्हटले आहे. नंदमुरी बालकृष्ण हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे चिरंजीव आहेत.
नंदमुरी बालकृष्ण म्हणाले, देशद्रोही, नमक हराम बाहेर या आणि लोकांचा सामना करा. लोक तुम्हाला मारुन पळवून लावतील. कुठेही लपले, किंवा बंकरमध्ये घुसून बसले तरीही भारत माता त्यांना दफन केल्याशिवाय राहणार नाही. आता विरोध सुरु झाला आहे, आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
Traitor, 'namak-haraam', come out & face people, they'll beat you up & make you run. No matter where you go & hide, even if you hide in a bunker Bharat Mata will bury you. Rebellion has begun & we'll not stay quiet: TDP MLA Nandamuri Balakrishna on PM #SpecialStatus (20.4.18) pic.twitter.com/nW8kLWqIoB
— ANI (@ANI) April 21, 2018
भाजपा आणि नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने टीडीपीला वागणूक दिली आहे त्यामुळे आम्हाला संबंध तोडावे लागले. आम्ही चार वर्षे वाट पाहिली होती.या काळात सर्व मार्ग अवलंबून पाहिले, साम-दाम-भेद. आता दंड बाकी आहे. आम्ही मोदींना तेलगु जनतेची काय ताकद असते ते दाखवून देऊ. आता मोदींकडे मागण्याची नाही तर त्यांच्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे, असेही यावेळी नंदमुरी बालकृष्ण म्हणाले.
दरम्यान, भाजपाने नंदमुरी बालकृष्ण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
AP CM Naidu's brother-in-law&party MLA Balakrishna talks like a lunatic.What is the kind of language he uses? Does he have sense? I think he has to be treated for mental illness. He has to be expelled from the party: Sudhish Rambhotla, BJP on TDP's Balakrishna comments on PM Modi pic.twitter.com/UKtyR7CPa9
— ANI (@ANI) April 21, 2018