PM मोदींनी ओडिशातील अपघातस्थळी दिली भेट; NDRF च्या जवानांकडून घेतली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 05:09 PM2023-06-03T17:09:52+5:302023-06-03T17:10:26+5:30
ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे.
Balasore Train Accident । ओडिशा : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज या घटनेवरून शोक व्यक्त करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी भेट देऊन NDRF च्या जवानांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मोदींनी अद्याप सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरून कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले. पीडितांना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आधी, ३०, ५०, ७० पाहता पाहता मृतांचा आकडा आता २०७ वरून २८० वर पोहचला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ९०० लोक जखमी आहेत अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वेअपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ३ जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ३ जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.
Odisha | Prime Minister Narendra Modi at the site of #BalasoreTrainAccident where he reviewed the restoration work that is underway. pic.twitter.com/XZ8hA9MSK9
— ANI (@ANI) June 3, 2023
PM Narendra Modi spoke to Cabinet Secretary and Health Minister from the site. He asked them to ensure all needed help is provided to the injured and their families. He also said that special care must be taken to ensure that the bereaved families don’t face inconvenience and…
— ANI (@ANI) June 3, 2023
तरूणाईचा मदतीचा हात
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अधिकाऱ्यांनी अपघाताबाबत घटनास्थळी माहिती दिली.
#WATCH | Odisha: Prime Minister Narendra Modi was briefed by Union Railways minister Ashwini Vaishnaw, Union Minister Dharmendra Pradhan and other officials about the #BalasoreTrainAccident at the site of the incident. pic.twitter.com/FeZMqwwhOW
— ANI (@ANI) June 3, 2023