बजेटपूर्वी नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसाेबत हाेणार बैठक; आर्थिक विकासाबाबत होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:11 PM2023-01-10T12:11:51+5:302023-01-10T12:12:15+5:30
निती आयाेगामध्ये १३ जानेवारीला ही बैठक हाेणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी राेजी मांडण्यात येणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अर्थतज्ज्ञांसाेबत बैठक बाेलाविली आहे. निती आयाेगामध्ये १३ जानेवारीला ही बैठक हाेणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुासर, बैठकीमध्ये पंतप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उपाययाेजनांबाबत चर्चा करतील. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी ताे ८.७ हाेता.