पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:39 PM2022-10-18T19:39:29+5:302022-10-18T19:39:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते गुजरातमधील गांधीनगर येथे डिफेन्स एक्सपो २०२२ चे उद्घाटन करणार आहेत.

Prime Minister Narendra Modi will inaugurate Defense Expo 2022 in Gandhinagar | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम

Next

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते गुजरातमधील गांधीनगर येथे डिफेन्स एक्सपो २०२२ चे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते डिफेन्स स्पेस मिशनलाही सुरुवात करणार असून, अंतराळाशी संबंधित सुरक्षे संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आव्हाने मांडणार आहेत. यावर मात करून भारत अंतराळ युद्धात मास्टर बनू शकेल. ही आव्हाने संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाणार आहेत. त्यामुळे उद्या होणारे डिफेन्स एक्सपो महत्वाचे मानले जात आहे. 

अंतराळातील आव्हाने पाच स्केलवर विभागली आहेत. यामध्ये तंत्रज्ञान प्रक्षेपण प्रणाली, उपग्रह प्रणाली, संप्रेषण आणि पेलोड प्रणाली, ग्राउंड सिस्टम आणि सॉफ्टवेअर प्रणालींचा समावेश आहे. पृथ्वी, समुद्र आणि आकाशातून हळूहळू युद्ध अवकाशाकडे सरकत आहे. भारतही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अवकाश विज्ञानाच्या युगात भारताची ही सुरुवात भविष्यासाठी महत्वाची आहे. 

पीएफआय संदर्भात मोठा खुलासा! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानी, वाचा सविस्तर

अंतराळ संरक्षण मोहिमेमुळे अवकाश-आधारित तंत्रज्ञान आणि खासगी क्षेत्राला चालना मिळेल. आतापर्यंत या मिशन अंतर्गत, ५० स्टार्टअप्स आहेत, २० मेक १ अंतर्गत आंशिक सरकारी निधी आणि उर्वरित मोठ्या सरकारी खर्चासह असतील. या मोहिमेत डीआरडीओ आणि इस्रोचीही मदत होईल. तसेच किमान ऑर्डरचे प्रमाण, प्रकल्प विकास बजेट आणि इतर गोष्टी वापरकर्त्याच्या आधारावर ठरवल्या जातील. भारतीय लष्कराप्रमाणेच नौदल किंवा हवाई दल या गोष्टी ठरवणार आहेत.

डिफेन्स एक्स्पोमध्ये 1320 हून अधिक सहभागी होत आहेत. यावेळची थीम थ्रीडी आहे. हे शस्त्र प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरवले जाते. यात ७५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हा डिफेन्स एक्स्पो आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा एक्स्पो गुजरातमध्ये होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा महत्वाचा मानला जात आहे. 

Web Title: Prime Minister Narendra Modi will inaugurate Defense Expo 2022 in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.