पंतप्रधान नरेंद्र मोदी उचलणार भविष्यात 'हे' पाऊल; आजच्या भाषणात दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:08 AM2019-08-15T11:08:54+5:302019-08-15T11:10:20+5:30
आम्ही जीएसटीच्या माध्यमातून एक देश, एक टॅक्स स्वप्न साकार केलं.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक मुद्दा चर्चेत आणला आहे. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात एकीकरण प्रक्रिया निरंतर सुरु राहणं गरजेचे आहे. एनडीए सरकारच्या कार्यकाळात देश एकीकरण प्रक्रियेच्या दिशेने वाटचाल करत आहे असं मोदींनी सांगितले.
नरेंद्र मोदींनी भाषणात म्हणाले की, आम्ही जीएसटीच्या माध्यमातून एक देश, एक टॅक्स स्वप्न साकार केलं. त्याचप्रकारे मागील काही दिवसांत ऊर्जा क्षेत्रात वन नेशन वन ग्रीड काम यशस्वीरित्या सुरु झालं आहे. वन नेशन, वन मोबिलिटी कार्डची व्यवस्था आम्ही विकसित केली. आज देशात व्यापक रुपाने चर्चा सुरु आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक. ही चर्चा व्हायला हवी. लोकशाहीत याची चर्चा होणं गरजेचे आहे.
स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पाकला गंभीर इशारा; मोदी म्हणाले... #NarendraModihttps://t.co/OJXI0kYEoJ
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2019
मागील वर्षभरापूर्वी विधी आयोगाने लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत शिफारश केली होती. यामुळे लोकांचे पैसे वाचविण्यात मदत होईल. याबाबत एक मसूदा कायदे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत देशात एक देश एक निवडणूक घेणं शक्य नाही. केंद्र सरकार याबाबत विचार करत आहे. निती आयोगाने मागील वर्षी एक उपाय सुचविला आहे की, 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाचा वेळ, निवडणुकांवर होणारा खर्चाची बचत होईल. या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सरकारकडून एका समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे.
Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी https://t.co/yv3t0sox4s#IndependenceDayIndia
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितले की, एक भारत श्रेष्ठ भारत याचं स्वप्न साकार करण्यासाठी अशा काही नवीन योजना, नवे प्रयोग करायला हवेत. आपल्याला देशाला जोडण्यासाठी मजबूत करण्यासाठी नेहमी पाऊलं उचलायला हवी. ही प्रक्रिया नेहमी सुरु राहील असा विश्वास त्यांनी दिला. तसेच देशाच्या एकीकरणासाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी कठीण प्रसंगी कठोर निर्णयही घेतले जाऊ शकतात. राजकारणात अनेक निर्णय राजकीय स्वार्थ पाहून केले जातात. माझ्यासाठी देशाचं भविष्य सर्वोच्च आहे. राजकीय भविष्याने काही होत नाही असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.