पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना दिल्या शुभेच्छा
By Admin | Published: March 24, 2017 09:51 AM2017-03-24T09:51:23+5:302017-03-24T09:51:23+5:30
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला केल्यानंतर भारताने लगेचच सर्जिकल स्ट्राईकव्दारे या हल्ल्याला उत्तर दिले होते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - पाकिस्तानात गुरुवारी राष्ट्रीय दिन साजरा झाला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना लिहीलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देताना भारताला आपल्या सर्व शेजा-यांबरोबर चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
भारताला पाकिस्तानबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचार नको असे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात भारत पाकिस्तानबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी कटिब्धद असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला केल्यानंतर भारताने लगेचच सर्जिकल स्ट्राईकव्दारे या हल्ल्याला उत्तर दिले होते. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे हा तणाव काही प्रमाणात निवळेल असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.