PM मोदींच्या आई हिरा बेन यांनी घेतली कोरोना लस, पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:20 PM2021-03-11T16:20:50+5:302021-03-11T16:25:47+5:30
देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील लोक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेले 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. (corona vaccines)
नवी दिल्ली - देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातच आज पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modis) यांच्या आई हिरा बेन (Heera Ben) यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात खुद्द पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. यापूर्वी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांनी कोरोना लस (corona vaccines) घेतली आहे. (Prime minister Narendra Modis mother Heera Ben also took corona vaccines first dose)
हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती -
आई हिराबेन यांनी कोरोना लस घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. यात त्यांनी लिहिले आहे, ‘मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की माझ्या आईने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, की आणप पुढे अधिकाधिक लोकांना कोरोना लस घेण्यासाठी प्रेरित करावे.’
Happy to share that my mother has taken the first dose of the COVID-19 vaccine today. I urge everyone to help and motivate people around you who are eligible to take the vaccine.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2021
लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे!
देशात सुरू आहे लसीकरणाचा दुसरा टप्पा -
देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील लोक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेले 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. आता सरकार यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचाही समावेश करणार आहे.