पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, जगातील अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:03 PM2022-12-30T15:03:07+5:302022-12-30T15:03:56+5:30

PM Modi Mother Heeraben Death : नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. यानंतर बहुतांश नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Prime Minister Narendra Modi's mother Heeraben passed away, many world leaders paid tribute | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, जगातील अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, जगातील अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. यानंतर जगातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. बहुतांश नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सर्वात आधी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी, तुमच्या प्रिय आईच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट फुमियो किशिदा यांनी केले आहे. 

नेपाळच्या पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले- पंतप्रधान मोदींच्या आई श्रीमती हिराबा मोदी यांच्या निधनाची बातमी कळताच मला खूप दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.

देउबा म्हणाले, 'आत्म्याला शांती लाभो'
हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनीही ट्विट केले आहे. ते म्हणाले, "नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना  त्यांच्या आदरणीय आई हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल माझ्या संवेदना. त्यांच्या चिरंतन आत्म्याला मोक्ष प्राप्त होवो."

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही नरेंद्र मोदींच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, 'आई गमावण्यापेक्षा मोठे नुकसान नाही. पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो.'

महिंदा राजपक्षे म्हणाले, ' बातमी ऐकून खूप दुःख झाले'
श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, श्रीमती हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. माझ्या सहानुभूती तुमच्या पाठीशी आहेत.

रशियाच्या राजदूतांकडून संवेदना 
भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी लिहिले - सर्वात मोठ्या नुकसानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. मला खूप दु:ख झाले. ओम शांती.

Web Title: Prime Minister Narendra Modi's mother Heeraben passed away, many world leaders paid tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.