पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ३७ नेत्यांची यादी जाहीर, महिला नेत्यांचीही नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 06:14 PM2021-07-06T18:14:20+5:302021-07-06T18:26:56+5:30
RSF Press Freedom Predators List: यादीत इम्रान खान आणि हुकूमशहा किम जोंगसह 37 नेत्यांची नावे
नवी दिल्ली: प्रेस वॉचडॉग- रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीज (RSF), ने जगातील विविध देशांच्या 37 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या नेत्यांवर त्या-त्या देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही नाव आहे.
सैन्य चालवतो देश
RSF ने म्हटले की, इम्रान खान यांच्या काळात देशावर सैन्यचा जास्त प्रभाव दिसतो. केव्हाही सेंसरशिप लावली जाते, वृत्तपत्रांच्या छपाईत अडथळे आणले जातात, माध्यम संस्थांना धमकावले जाते, टीव्ही चॅनल्सचे सिग्नल जाम केले जातात. इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
खगोशी हत्याकाडांस जबाबदार
सौदी अरबचे क्राउन प्रिंस बिन सलमान यांच्या शासनाला RSF ने अत्याचारी म्हटले आहे. तसेच, गुप्तहेरी आणि धमकावण्याच्या पद्धती कधी-कधी अपहरण आणि अत्याचारापर्यंत जातात. जमाल खशोगीच्या हत्येतून देशातील परिस्थिती दिसते, असेही RSF ने म्हटले आहे.
यादीत महिला नेत्याचे नाव
या यादीत एका महिला नेत्याचेही नाव आहे. हॉन्गकॉन्गच्या अॅडमिनिस्ट्रेटिव चीफ कॅरी लॅम यांनी देशात 2018 मध्ये आणलेल्या डिजिटल सिक्योरिटी कायद्याला अत्याचारी म्हटले आहे. या कायद्यामुळे 70 पेक्षा जास्त पत्रकार आणि ब्लॉगर्सवर खटला दाखल करण्यात आल्याचे RSF ने म्हटले आहे.
यादीत या नेत्यांची नावे
- अब्देल फतह अल सिस्सी, इजिप्ट
- अलेंक्जेंडर लूकाशेंको, बेलारूस
- अली खमेनेई, इराण
- बशर अल-असद, सीरिया
- कैरी लैम, हॉन्गकॉन्ग
- डेनियल ऑर्टेगा, निकारागुआ
- इमोमली रखमॉन, ताजिकिस्तान
- गोताबाया राजपक्षा, श्रीलंका
- गुरबंगुली बर्डीमॉखम्मेदोव, तुर्कमेनिस्तान
- हामिद बिन इसा अल खलीफा, बहरीन
- हुन सेन, कंबोडिया
- इलहम अलिएव, अजरबैजान
- इमरान खान, पाकिस्तान
- इस्माइल ओमर गुएल्लेह, दजिबाउती
- इस्सायस अफवर्की, इरिट्रिया
- जायर बोलसोनारो, ब्राझील
- किम जोंग उन, उत्तर कोरिया
- ली सिएन लूंग, सिंगापोर
- मिगुएल डायज-कनेल, क्यूबा
- मिन ऑन्ग लायंग, म्यांमार
- मोहम्मद बिन सलमान, सऊदी अरब
- नरेंद्र मोदी, भारत
- एनगुएन फु ट्रोंग, वियतनाम
- निकोलस मदुरो, वेनेजुएला
- पॉल बिया, कॅमरून
- पॉल कगामे, रवांडा
- प्रायुत चान-ओ-चा, थाईलैंड
- रमजान कैदिरोव, रशिया
- रेसेप तैइप एर्डोगन, तुर्की
- रॉड्रिगो दुर्तेते, फिलिपींस
- सल्वा कीर, दक्षिण सूडान
- शेख हसीना, बांग्लादेश
- तेइयोडोरो गुएमा एमबासोगो, इक्वाटोरियल गुनिया
- विक्टर ऑर्बन, हंगरी
- व्लादिमीर पुतिन, रशिया
- शी जिनपिंग, चीन
- योवेरी मुसेवेनी, यूगांडा