साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:01 AM2017-12-15T05:01:02+5:302017-12-15T05:01:02+5:30

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Prime Minister Narendra Modi's road show in Sabarmati; The criticism of the Congress | साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

googlenewsNext

नवी दिल्ली/अहमदाबाद : साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदींनी मिनी रोड शो केला. आपल्या कारच्या फूटबोर्डवर उभे राहून ते ३०० मीटरहून अधिक अंतर लोकांना हात दाखवत गेले. मोदींनी कारच्या फूटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती आणि भाजपचे झेंडेही त्यावेळी फडकावले जात होते. ही सर्व दृश्ये सर्व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली.
त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत व प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊ न नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुजरातमध्ये मतदानानंतर पंतप्रधान लगेच रोड शो करीत असतील, तर त्याबद्दल निवडणूक आयोग काही कारवाई करणार का, असा सावल त्या दोघांनी केला. संकेत व नियम लोकांच्या डोळ्यादेखत पायदळी तुडवले जात आहेत, असे सांगून अशोक गहलोत म्हणाले की, मोदींनी आचारसंहितेचे उघड उल्लंघन केले असून, त्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. गुजरातमध्ये पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने हताश झालेले भाजप नेते असे प्रकार करीत आहेत, असा टोला लगावून रणदीप सूरजेवाला म्हणाले की, हे सारे दिसत असूनही निवडणूक आयोग त्याबद्दल पंतप्रधानांकडे विचारणाही करताना दिसत नाही. निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे आणि भाजपने आयोगाला ओलीसच ठेवले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विमानतळावरील पत्रकार परिषदेवरही निवडणूक आयोगाने सोयिस्कर मौन बाळगले, असा आरोप सूरजेवाला यांनी केला. निवडणूक आयोग देशाच्या राज्यघटनेकडेच दुर्लक्ष करीत असल्याची टीका करून ते म्हणाले की, राहुल गांधींच्या टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग अर्ध्या तासात कारवाई करते; पण मोदींचा रोड शो सर्वत्र दिसत असतानाही आयोग गप्प राहतो.

चिदम्बरम यांचाही हल्लाबोल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका केली. राहुल गांधी यांना टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग नोटीस बजावतो; पण पंतप्रधान रोड शोद्वारे मतदानाच्या दिवशी प्रचार करतात, रेल्वेमंत्री व भाजपचे अध्यक्ष दिल्ली व अहमदाबाद विमानतळावर पत्रकार परिषद घेतात, याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्याविरुद्ध साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही, याचा उल्लेख करीत चिदम्बरम यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

Web Title: Prime Minister Narendra Modi's road show in Sabarmati; The criticism of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.