पुन्हा भेदली पंतप्रधान मोदींची सुरक्षाव्यवस्था; सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:45 AM2023-03-26T10:45:29+5:302023-03-26T10:45:35+5:30

जानेवारीत कर्नाटकातीलच हुबळी येथे 'रोड शो' दरम्यान एक मुलगा असाच मोदींच्या जवळ पोहोचला होता.

Prime Minister Narendra Modi's security system breached again; This is the second incident of security breach in 3 months | पुन्हा भेदली पंतप्रधान मोदींची सुरक्षाव्यवस्था; सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना

पुन्हा भेदली पंतप्रधान मोदींची सुरक्षाव्यवस्था; सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत शनिवारी त्रुटी झाल्याचे आढळून आले. एक तरुण सुरक्षाकडे भेदून पंतप्रधानांच्या गाडीच्या दिशेने पळत आला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी केली जात आहे. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

जानेवारीत कर्नाटकातीलच हुबळी येथे 'रोड शो' दरम्यान एक मुलगा असाच मोदींच्या जवळ पोहोचला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आडव्या-उभ्या रेघांचा शर्ट आणि निळी पँट घातलेला एक तरुण मोदींच्या ताफ्याकडे धावताना त्यात दिसून येतो. भाजपाने दावणगिरी येथे 'विजय संकल्प यात्रे'ला प्रारंभ केला.

 

Web Title: Prime Minister Narendra Modi's security system breached again; This is the second incident of security breach in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.