अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:55 PM2024-03-18T16:55:17+5:302024-03-18T16:56:20+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर पंतप्रधान मोदींपासून अन्य विरोधी पक्षही तयारीला लागले आहेत.

Prime Minister Narendra Modi's target on India Allaince, BJP's public meeting in Karnataka | अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं

अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं

Narendra Modi ( Marathi News ) विकसित भारतासाठी ४०० पार, विकसित कर्नाटकासाठी ४०० पार, गरिबी कमी करण्यासाठी ४०० पार, दहशतवादावर प्रहार करण्यासाठी ४०० पार, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ४०० पार, शेतकरी समृद्ध करण्यासाठी ४०० पार, युवकांना नव्या संधीसाठी ४०० पार, अबकी बार ४०० पार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकात दिला आहे. याठिकाणी सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुमचे हे प्रेम आणि आपला आशीर्वाद, कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात भाजपाला मिळालेली ही जनसमर्थनाची लाट, ही ऊर्जा, हे दृश्यच जणू काही संपूर्ण मैदान ऊर्जेने भरले आहे. हे पाहून दुसरीकडे, भ्रष्टाचार आणि द्वेषाच्या राजकारणात बुडलेल्या इंडिया आघाडीची झोप उडाली असावी. काही महिन्यातच काँग्रेस सरकारविरोधात कर्नाटकात लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. एनडीएचे खासदार केंद्राच्या योजना चांगल्यारितीने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करतील असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुंबईच्या शिवाजी पार्क सभेतून शक्ती नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. नारीशक्ती, त्यांचा आशीर्वादच माझे सर्वात मोठे कवच आहे. इंडिया आघाडीला ही शक्ती नष्ट करायची आहे. भारत मातेच्या वाढल्या प्राबल्याचा त्यांना राग आहे. शक्तीवर वार म्हणजे महिला, मुली आणि भारत मातेवर वार आहे असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर पंतप्रधान मोदींपासून अन्य विरोधी पक्षही तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी १२० तास दक्षिण विजय अभियानावर आहेत. भाजपाने ४०० पार लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न सुरू केलेत. ४०० पार हा नारा तेव्हाच पूर्ण होऊ शकतो जेव्हा भाजपा दक्षिणेकडील राज्यात विजय मिळवू शकेल. विशेषत: तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात भाजपा बहुतांश जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. 

Web Title: Prime Minister Narendra Modi's target on India Allaince, BJP's public meeting in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.