'भारताचे पंतप्रधान', भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचे पत्र शेअर केले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:09 PM2023-09-05T23:09:40+5:302023-09-05T23:10:04+5:30
पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देणाऱ्या पत्रात 'भारताचे पंतप्रधान' असे लिहिले आहे. हे पत्र संबित पात्रा यांनी शेअर केले आहे.
इंडिया की भारत या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू असताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देणारे पत्र शेअर केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींसाठी 'भारताचे पंतप्रधान' असे लिहिले आहे.
'भारत' नावावर चर्चा असताना विरोधकांची बैठक, काँग्रेस म्हणाली, 'आमच्या युतीने भाजप घाबरला'
भाजप नेते संबित पात्रा यांनी पोस्ट केलेल्या पत्रात इंग्रजीत माहिती आहे, याचा मराठीत अर्थ "भारताचे पंतप्रधान असा आहे. नरेंद्र मोदी यांची इंडोनेशिया प्रजासत्ताक शिखर परिषद आणि १८ वी EAS शिखर परिषद ७ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.
पीएम मोदी 20 व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि १८ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी बुधवारी रात्री इंडोनेशियाला रवाना होतील. इंडोनेशिया ASEAN शिखर परिषद आयोजित करत आहे. ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेमुळे पंतप्रधान मोदींची ही भेट खूपच कमी असेल.
BJP spokesperson Sambit Patra posts on X official information on PM Modi''s visit to Indonesia, referring to him as the ''Prime Minister of Bharat'' pic.twitter.com/Kg8jDUh7ig
— Press Trust of India (@PTI_News) September 5, 2023