योगाचे गुणगान करणा-या पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम

By admin | Published: June 28, 2015 12:33 PM2015-06-28T12:33:36+5:302015-06-28T19:41:33+5:30

ललित मोदी प्रकरणावरून सध्या देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या मुद्यावर मौन बाळगत 'मन की बात'मधून योग दिनाचे गुणगान कायम ठेवले.

The Prime Minister praising Yoga has remained silent on controversial issues | योगाचे गुणगान करणा-या पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम

योगाचे गुणगान करणा-या पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - ललित मोदी प्रकरणावरून सध्या देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या मुद्यावर मौन बाळगत 'मन की बात'मधून योग दिनाचे गुणगान कायम ठेवले. आकाशवाणीच्या माध्यमातून पंतप्रधान देशभरातील जनतेशी दर महिन्याला संवाद साधत असतात. या कार्यक्रमादरम्यान अनेक महत्वांच्या मुद्यांवर ते आपले विचार मांडत असतात. आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणातील फरारी आरोपी ललित मोदी यांच्यावरून सुषमा स्वराज, वसुंधरा राजे या भाजपा नेत्या अडचणीत सापडलेले असताना, त्यावरून देशभरात गदारोळ माजलेला असून विरोधकांनी पंतप्रधानांना या विषयावर मौन सोडण्याचे आवाहन केले असतानाही पंतप्रधानांनी आजही या विषयाबद्दल एकही अवाक्षर काढले नाही. तसेच चिक्की घोटाळाप्रकरणी अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेच्या मुद्यावरही ते काहीही बोलले नाहीत.
आजच्या 'मन की बात'मध्ये त्यांनी गेल्या आठवड्यात साजरा झालेला योग दिन, त्याला जगभरातून मिळालेला प्रतिसाद, तसेच पाणी संवर्धन आणि बेटी बचाओ मोहिम अशा विषयांवर भाष्य केले. 
' २१ जून रोजी झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय यशस्वी झाला असला तरी ती एक नवी जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. त्या दिवशी जिथे जिथे सूर्याची किरणे पोचली तिथे सगळीकडे योगदिन उत्साहात साजरा झाला. जगभरातील देशांनी योगदिन साजरा करत ' योगाचा ' गौरव केला असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी देशवासियांनानी पाणी बचतीचे महत्वही सांगितले. पावसाळ्यासारखा आल्हाददायक ऋतू सर्वांनाचा आवडतो, पण पाणी हे आपले जीवन असून त्याची बचत व संवर्धन करणे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याची बचत करणे गरजेचे असल्याचे सांगत युवक व सामाजिक संस्थांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. 
'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहिमेसाठी टॅगलाईन पाठवण्यास सांगत #selfiewithdaugher या हॅशटॅगने आपल्या मुलीसोबतचा फोटो पोस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी देशभरातील नागरिकांना केले. 

Web Title: The Prime Minister praising Yoga has remained silent on controversial issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.