पंतप्रधान सहा दिवसांनी मायदेशी

By admin | Published: May 20, 2015 02:26 AM2015-05-20T02:26:34+5:302015-05-20T02:26:34+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन देशांचा दौरा आटोपून मंगळवारी मायदेशाकडे प्रयाण केले. चीन, मंगोलिया व दक्षिण कोरिया या तीन देशांना मोदी यांनी भेट दिली

Prime Minister resides in six days | पंतप्रधान सहा दिवसांनी मायदेशी

पंतप्रधान सहा दिवसांनी मायदेशी

Next

तीन देशांचा दौरा : मेक इन इंडियासाठी मोदींनी केली मोर्चेबांधणी
उलसान (दक्षिण कोरिया) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन देशांचा दौरा आटोपून मंगळवारी मायदेशाकडे प्रयाण केले. चीन, मंगोलिया व दक्षिण कोरिया या तीन देशांना मोदी यांनी भेट दिली व द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि या देशांशी भारताचे संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न केले.
मोदी यांनी या दौऱ्याची सुरुवात चीनपासून केली, तिन्ही देशांतील नेत्यांशी वाटाघाटी केल्या व ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. या देशांशी आपले संबंध सुधारले असून त्याचा फायदा आपल्या लोकांना निश्चित होईल, असा विश्वास मला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
प्रतिस्पर्धा आली तर आशिया खंड मागे पडेल. आशिया खंडातील देशांनी एकत्र येऊन दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करणे गरजेचे असून, त्यात भारत आपली जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सेऊल येथे आशियन लीडरशिप फोरमसमोर बोलत होते. या दौऱ्यातील त्यांचा हा अखेरचा कार्यक्रम होता.
मोदी यांच्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. हा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशाकडे रवाना झाले. (वृत्तसंस्था)


त्याआधी सेऊलमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, आशिया खंडाचा उदय एक होऊनच होईल. प्रत्येक देशाने आपला वेगळा विचार करू नये, असे मोदी यांनी सांगितले. आशिया खंडातील नेत्यांत प्रतिस्पर्धा निर्माण झाल्यास आपण मागे पडू, समृद्धी आणि विकास यासाठी सर्व प्रांतिक देशांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Prime Minister resides in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.