पंतप्रधानांनी मौन सोडावे

By Admin | Published: October 6, 2015 03:43 AM2015-10-06T03:43:25+5:302015-10-06T03:43:25+5:30

गोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे.

Prime Minister should silence | पंतप्रधानांनी मौन सोडावे

पंतप्रधानांनी मौन सोडावे

googlenewsNext

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
गोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे. सोबतच देशात सद्भावना कायम राखण्यासाठी पक्षातर्फे येत्या १० आॅक्टोबरला उपवास ठेवण्यात येणार आहे.
पक्षाचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सोमवारी येथे उपवास कार्यक्रमाची घोषणा करताना सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच नेते यात सहभागी होतील. कुठलीही अडचण न आल्यास हे हत्याकांड घडले त्या दादरीतील बिसहडा गावात हे आयोजन करण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनुसरण करीत समाजात बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न पक्ष या माध्यमाने करणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. निवडणूक राजकारणासाठी हे सर्व घडत असून या मुद्यावर पंतप्रधानांचे मौन म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांची स्वीकृतीच समजायची काय, असा सवालही त्यांनी केला.

सरकारची काय भूमिका?
मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रमोद तिवारी म्हणाले की, राज्यघटनेची शपथ घेणारे त्यांचे मंत्रीच चिथावणीखोर वक्तव्ये करून घटनेचा अवमान करीत आहेत. अशात या संवेदनशील मुद्यावर सरकारची काय भूमिका आहे, याचा खुलासा पंतप्रधानांनी करणे गरजेचे आहे.
मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे महेश शर्मा आणि संजीव बलियान या मुद्यावर जे बोलत आहेत तेच मोदी सरकारचे विचार समजायचे काय?

Web Title: Prime Minister should silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.