मशिदीतून अजानचा आवाज सुरु होताच पंतप्रधानांनी थांबवलं भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 04:00 PM2017-11-30T16:00:58+5:302017-11-30T16:47:33+5:30
गुजरातमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. या रणधुमाळीमध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे.
नवसारी- गुजरातमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. या रणधुमाळीमध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. बुधवारी गुजरातमध्ये त्यांनी चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि एक सभा दक्षिण गुजरातमध्ये झाली. दक्षिण गुजरात येथील नवसारीतील प्रचारसभेला मोदी संबोधित करत असताना जवळच्या एका मशिदीतून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी दोन मिनिटांसाठी भाषण थांबवले.
PM Narendra Modi pauses speech during Navsari rally yesterday on hearing the Azaan #GujaratElection2017pic.twitter.com/MfwN4orIyH
— ANI (@ANI) November 30, 2017
पंतप्रधान मोदीं यांचे नवसारीतील सभेत भाषण सुरु असताना जवळील मशिदीतून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी त्यांचे भाषण दोन मिनिटांसाठी थांबवले. अजान संपवल्यावर मोदींनी त्यांचे भाषण पुन्हा सुरु केले. यावेळी त्यांनी जीएसटीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. जीएसटीचा उल्लेख गब्बर सिंग टॅक्स असा करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट असल्याचे म्हटले.
(आणखी वाचा : गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका )
- या आधीही पंतप्रधानांनी थांबवले होतं भाषण -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या पूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजान सुरु होताच आपलं भाषण थांबवल्याचं दिसत होत. 27 मार्च 2016 चा तो व्हिडीओ होता. उत्तरप्रदेशमधील निवडणूकीत तो व्हारल झाला होता.
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com