तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी केली चर्चा
By admin | Published: September 24, 2016 02:09 PM2016-09-24T14:09:29+5:302016-09-24T14:19:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांची भेट घेतली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला तीन्ही दलांच्या प्रमुखांशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते.
उरी दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून, उरीच्या हल्लेखोरांना धडा शिकवावा अशी देशवासियांची भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तीन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत झालेली बैठक महत्वपूर्ण आहे. या बैठकीत देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
आणखी वाचा
उरी हल्ल्याला जबाबदार असलेल्या एकालाही सोडणार नाही असे पंतप्रधानांनी आधीच जाहीर केले आहे. पंतप्रधानांचे आज कोझीकोडे येथे भाषण होणार आहे. उरी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. पंतप्रधान आज पाकिस्तानबद्दल काय भूमिका घेतात याकडे सगळया देशाचे लक्ष लागले आहे.