पंतप्रधान आज ‘विक्रमादित्य’वर
By admin | Published: June 14, 2014 03:19 AM2014-06-14T03:19:32+5:302014-06-14T03:19:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत असून ते विक्रमादित्य युद्धनौकेची पाहणी करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पणजीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत असून ते विक्रमादित्य युद्धनौकेची पाहणी करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पणजीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नौदलाच्या वास्को येथील आयएनएस तळावर किनाराधिष्ठीत चाचणी सेवेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सकाळी दहाला उद्घाटन होईल. त्यानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत पणजी व परिसरात तीन कार्यक्रम होतील. गोव्यातील मांडवी नदीवरील चारशे कोटींच्या साडेचार किलोमीटर लांबीच्या पुलाची ते पायाभरणी करतील.
भाजपाच्या सुमारे आठ हजार बुथस्तरीय कार्यकर्त्यांना पणजी- दोनापावल येथील स्टेडियममध्ये ते दुपारी चारला मार्गदर्शन करतील. सायंकाळी साडेसहाला पंतप्रधान मिरामार येथील मेरियट हॉटेलमध्ये राज्यातील सुमारे दीडशे बुद्धीजीवींसमोर आपले विचार मांडतील, असे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)