'पंतप्रधान जी, तुम्ही एकाकी पडाल', तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर मोदी सरकारला दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 07:16 PM2024-07-24T19:16:48+5:302024-07-24T19:20:57+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'हा अर्थसंकल्प तुमचा कारभार वाचवू शकतो, पण देशाला नाही, असा टोला एम के स्टॅलिन यांनी पीएम नरेंद्र मोदी यांनी लगावला.
PM मोदींचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितलं 'लॉजिक'
आज इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांनी अर्थसंकल्पाविरोधात संसदेबाहेर निदर्शने केली. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ट्विटरवरुन पीएम मोदी यांच्यावर टीका केली. '#INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय आर्थिक अहवालात अनेक राज्यांचा समावेश न केल्याबद्दल निषेध केला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, तुम्ही म्हणालात, निवडणुका संपल्या आहेत, आता आपल्याला देशाचा विचार करायचा आहे, पण उद्याचा #Budget2024 तुमचा कारभार वाचवेल, पण भारतीय राष्ट्र नाही', अशी टीका मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केली.
मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले, 'तुम्ही सामान्यपणे सरकार चालवा, ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत पराभूत केले त्यांचा बदला घेऊ राहू नका. मी तुम्हाला सल्ला देण्यास बांधील आहे की जर तुम्ही राजकीय आवडी-निवडीनुसार सरकार चालवले तर तुम्ही एकटे पडाल, असंही स्टॅलिन म्हणाले.
ஒன்றிய நிதிநிலை அறிக்கையில் ஒருசில மாநிலங்கள் நீங்கலாகப் பல்வேறு மாநிலங்கள் புறக்கணிக்கப்பட்டிருப்பதைக் கண்டிக்கும் வகையில் #INDIA கூட்டணி எம்.பி.க்கள் போராட்டம் நடத்தியுள்ளார்கள்.
— M.K.Stalin (@mkstalin) July 24, 2024
மாண்புமிகு பிரதமர் @narendramodi அவர்களே…
“தேர்தல் முடிந்துவிட்டது, இனி நாட்டைப் பற்றியே… pic.twitter.com/95xXotDQDa
सोनं ४ हजार रुपयांनी झालं स्वस्त
काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी सोनं आणि चांदीवरील टॅक्स कपातीची घोषणा केली. यामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.आज बुधवारी म्हणजेच अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तर, चांदी ८४८९७ रुपये प्रति किलो दराने उघडली. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एका झटक्यात सराफा बाजारात सोने ३६१६ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदी ३२७७ रुपये प्रतिकिलो दराने घसरली.आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४०८ रुपयांनी घसरून ६९१९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २३ कॅरेट सोन्याचे दरही ४०६ रुपयांनी घसरून ६८९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.