पंतप्रधानांचे फरार आरोपी ललित मोदींशी काय संबंध आहेत? - कांग्रेसचा हल्ला

By admin | Published: June 15, 2015 05:02 PM2015-06-15T17:02:20+5:302015-06-15T17:02:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसने भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.

Prime Minister's absconding relationship with Lalit Modi? - Congress attack | पंतप्रधानांचे फरार आरोपी ललित मोदींशी काय संबंध आहेत? - कांग्रेसचा हल्ला

पंतप्रधानांचे फरार आरोपी ललित मोदींशी काय संबंध आहेत? - कांग्रेसचा हल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसने भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षी ललित मोदींनी पत्नीच्या कर्करोगावरील उपचारासाठी व्हिसा मिळण्यासाठी सहाय्य मिळावं अशी मागणी केली होती. स्वराज यांनी इंग्लंडचा आसरा घेतलेल्या मोदींना असा व्हिसा द्यावा त्यास भारत हरकत घेणार नाही असे कळवले आणि फरार आरोपीला सहाय्य केलं. आयपीएल बेटिंग, पैशाची अफरातफर आदी प्रकरणी शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये ललित मोदी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनायला हवे आहेत, परंतु ललित मोदी इंग्लंडमध्ये लपून बसले आहेत. असे असताना स्वराज यांनी अशा फरार आरोपीला का मदत केली असा प्रश्न विचारला आणि यामागे नरेंद्र मोदी व अमित शाह यांचेही संबंध आहेत का अशी विचारणा काँग्रेसचे नेते रणदीप सर्जेवाला यांनी केली आहे.
दरम्यान, स्वराज यांची मुलगी बासुरी व तिचे पती स्वराज कौशल या दोघांनी मोदी यांच्यासाठी वकिली केली असल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे स्वराज यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे, तसेच स्वराज यांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह, अमित शाह व भाजपाने स्वराज यांची पाठराखण केली आहे आणि केवळ मानवतावादी दृष्टीकोनातून सहाय्य केल्याचे सांगितले.

Web Title: Prime Minister's absconding relationship with Lalit Modi? - Congress attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.