पंतप्रधानांनी वाढदिवशी घेतले आईचे आशीर्वाद

By admin | Published: September 18, 2016 04:28 AM2016-09-18T04:28:45+5:302016-09-18T05:57:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींयांनी आपला ६६ वा वाढदिवस शनिवारी गुजरातमध्येच साजरा केला.

Prime Minister's birthday took place on the blessings of Mother | पंतप्रधानांनी वाढदिवशी घेतले आईचे आशीर्वाद

पंतप्रधानांनी वाढदिवशी घेतले आईचे आशीर्वाद

Next


अहमदाबाद/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपला ६६ वा वाढदिवस शनिवारी गुजरातमध्येच साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि विविध संवयंसेवी संघटनांनी गुजरातच नव्हे, तर देशभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी सकाळी गांधीनगरमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. 
आईची भेट घेण्यासाठी नरेंद्र मोदी ज्या कारमधून मोदी गेले, त्यात त्यांच्यासमवेत कोणीच नव्हते. मात्र ते आईला भेटायला येणार, हे माहीत असल्याने घरी पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांच्याबरोबरच भाजपाचे काही नेते व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. तरीही छायाचित्रांत आणि दृश्यांत आपण व आई यांच्याखेरीज कोणीही दिसणार नाही, याची काळजी पंतप्रधानांनी घेतली.
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 
त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला होता. प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत देशाचा गौरव ठरणाऱ्या सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरण्यात आला होता. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींच्या कामिगरीचा उल्लेखही त्यावर होता. सुरत येथे हा केक कापण्यात आला. 
स्वच्छ भारत अभियान आण िआणि मुलींना मोफत पुस्तके पुरविण्यासारख्या सामाजिक कार्यात भूमिका बजावणाऱ्या अतुल बेकरीने हा केक तयार करण्याचे केला. हा केक कापल्यानंतर दिव्यांग, कमकुवत आणि वंचित घटकांमधील मुलींना तो वाटण्यात आला. सकाळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लिमखेडा गावात वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक विकास योजनांचा आरंभ करण्यात आला. दुपारी त्यांच्या हस्ते नवसारीत ११ हजार २00 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचे वाटप करण्यात आले. तसेच २२00 जणांना श्रवणयंत्रे आणि १२00 जणांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. (वृत्तसंस्था/लोकमत न्यूज नेटवर्क)
>हदपाडी आणि कोटवाडियासारख्या अतिमागास भागात काम करणाऱ्या शक्ती फाऊंडेशनने या अनोख्या केकची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, म्हणून प्रयत्न चालविले आहेत. देशभरातील एक हजाराहून अधिक गिटारवादकांनी सुरतमध्ये शांततेचा संदेश देणरी धून वाजवली. त्यांनी मोदींच्या जन्मिदनानिमित्र खास धून तयार केली होती.

Web Title: Prime Minister's birthday took place on the blessings of Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.