पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार आता स्वामींचे नवे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 11:17 AM2016-06-22T11:17:20+5:302016-06-22T12:34:21+5:30
भाजप खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवणारे भाजप खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
बौद्धिक संपदा हक्काविषयी अरविंद सुब्रमण्यम यांच्या भूमिकेवर स्वामी यांनी आक्षेप नोंदवला आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्ताचा हवाला देऊन स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांनी औषधनिर्माण नियमातंर्गत अमेरिकेला भारतावर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता असा आरोप केला आहे.
नरेंद्र मोदींनी मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकन काँग्रेसला कारवाईची लिखित शिफारस केली होती असे स्वामी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. भारताने पेंटट कायद्यामध्ये बदल करावा अशी त्यांची मागणी होती. स्वामी यांनी यापूर्वी अर्थतज्ञ आणि आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळेच राजन यांनी आरबीआय गर्व्हनरपदाची दुसरी टर्म नको अशी भूमिका घेतली.
Who said to US Cong on 13/3/13 the US should act against India to defend US Pharmaceuticals interests? Arvind Subramanian MoF !! Sack him!!!
— Subramanian Swamy (@Swamy39) June 22, 2016