प्रिन्स विल्यम, केट मिडल्टन प्रथमच येणार भारतात
By admin | Published: March 2, 2016 03:06 AM2016-03-02T03:06:14+5:302016-03-02T03:06:14+5:30
ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन प्रथमच भारतात येणार असून, पुढील महिन्यात मुंबई, दिल्ली, काझिरंगा आणि आग्राला भेट देणार असून, या भेटीत ते ताजमहालचीही सैर करणार आहेत.
मुंबई : ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन प्रथमच भारतात येणार असून, पुढील महिन्यात मुंबई, दिल्ली, काझिरंगा आणि आग्राला भेट देणार असून, या भेटीत ते ताजमहालचीही सैर करणार आहेत.
केसिंग्टन पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे शाही दाम्पत्य १० एप्रिलला मुंबईत येणार असून, त्यानंतर ते दिल्लीला जाईल. १२ एप्रिल रोजी ते काझिरंगा आणि त्यानंतर ते १४ एप्रिलला भूतानची राजधानी थिंपू येथेही जाणार आहेत. भूतानच्या राजघराण्याची भेट घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात ते आग्रा येथील ताजमहालला भेट देणार आहेत.
विल्यम आणि केट हे शाही दाम्पत्य या दौऱ्यात भारताची गौरवशाली इतिहास जाणून
घेईल, तसेच भारतीय युवकांच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यात आणि २१ व्या शतकातील त्यांची भूमिका समजून घेण्याचीही या शाही दाम्पत्याची इच्छा असल्याचे प्रवक्याने सांगितले.
प्रिन्सेस डायनानेही
घेतली होती भेट
२४ वर्षांपूर्वी १९९२ साली प्रिन्सेस डायनानेही भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात डायना यांनी ताजमहालला भेट दिली होतीच, शिवाय त्यांनी भारताच्या संस्कृतीचा जवळून अनुभवही घेतला होता.