शाळेतच प्रिंसिपल आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, रूममधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:08 IST2025-01-20T12:08:28+5:302025-01-20T12:08:51+5:30
Rajasthan News: राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यामधील एका सरकारी शाळेमधून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षिका अश्लील चाळे करताना चित्रित झाले आहेत.

शाळेतच प्रिंसिपल आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, रूममधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यामधील एका सरकारी शाळेमधून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षिका अश्लील चाळे करताना चित्रित झाले आहेत.
चित्तौडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमधील सालेरा विद्यालयात हा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. या शाळेतील प्रिंसिपल अरविंद व्यास हे एका शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करत असनाता व्हिडीओमध्ये दिसत आहेत. असे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून, हे व्हिडीओ काही दिवस जुने असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका व्हिडीओमध्ये राजस्थान राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि शाळेचे प्रिंसिपल असलेले अरविंद व्यास हे आपल्या जागेवर गुटखा खाताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका शिक्षिकेसोबत चाळे करताना दिसत आहेत.
या धक्कादायक घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाा शिक्षणाधिकारी राजेंद्र शर्मा यांनी सांगितले की, व्हिडीओंची तपासणी केल्यानंतर संस्थेचे प्रमुख आणि संबंधित शिक्षिकेबाबत कारवाई केली जाईल.