चर्चिल आलेमाव यांच्या घरावर व कार्यालयावर छापा
By admin | Published: August 11, 2015 11:16 PM2015-08-11T23:16:08+5:302015-08-11T23:16:08+5:30
जैका-लुईस बर्जर लाच प्रकरण
Next
ज का-लुईस बर्जर लाच प्रकरणक्राईम ब्रँचची कारवाई : महत्त्वाची कागदपत्रे हस्तगतमडगाव : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या वार्का येथील घरावर, तसेच कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी छापा घातला. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी 4 वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चालू होती.क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई व निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. प्रभूदेसाई यांच्या पथकाने आलेमाव यांच्या वार्का येथील घराची, तर कर्पे यांनी आलेमाव यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या छापासत्रामुळे आलेमाव यांच्या घरातही काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. चर्चिल यांच्या कुटुंबीयांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनाही बोलविण्यात आले. या छाप्यात क्राईम ब्रँचच्या हाती नेमके काय लागले, हे मात्र कळू शकले नाही. आलेमाव हे सध्या क्राईम ब्रँचच्या अटकेत असून त्यांच्या कोठडीचा रिमांड गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. (प्रतिनिधी)ढँ3 : 1108-टअफ-21कॅप्शन : आलेमाव यांच्या वार्का येथील निवासस्थानाच्या बाहेर असलेले क्राईम ब्रँचचे पोलीस. (छाया: अरविंद टेंगसे)ढँ3 : 1108-टअफ-22कॅप्शन: वार्का येथील कार्यालयाची झडती घेताना क्राईम ब्रँचचे अधिकारी. (छाया: अरविंद टेंगसे)ढँ3 : 1108-टअफ-23कॅप्शन: आलेमाव यांच्या वार्का येथील बंगल्यावर टाकलेल्या छाप्यावेळी पंचनामा करताना निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई. (छाया: अरविंद टेंगसे)