इंद्राणी-पीटर मुखर्जीच्या कंपनीमुळे चिदंबरम यांच्या घरावर छापा

By admin | Published: May 16, 2017 08:53 AM2017-05-16T08:53:33+5:302017-05-16T13:25:55+5:30

सीबीआयने मंगळवारी सकाळी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर छापा मारला.

Printed on Chidambaram's house by Indrani-Peter Mukherjee's company | इंद्राणी-पीटर मुखर्जीच्या कंपनीमुळे चिदंबरम यांच्या घरावर छापा

इंद्राणी-पीटर मुखर्जीच्या कंपनीमुळे चिदंबरम यांच्या घरावर छापा

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 16 - आयएऩएक्स मीडिया प्रायव्हेट मीडिया लिमिटेडच्या एफडीआयला मंजुरी दिल्या प्रकरणी मंगळवारी सकाळी सीबीआयने  वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्थी चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर छापे मारले. सीबीआयने या प्रकरणी कार्थी, पीटर मुखर्जी, इंद्रानी मुखर्जी, दोन खासगी कंपन्या आणि अर्थमंत्रालयाच्या अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई केली.
 
आयएनएक्सच्या एफडीआयला मंजुरी देताना त्यामध्ये भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कारस्थान असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. चिदंबरम पिता-पुत्रांच्या निवासस्थान, कार्यालयासह अन्य आरोपींच्या मुंबई, दिल्ली आणि गुरगाव येथील एकूण 14 ठिकाणांवर छापे मारले. 
 
सीबीआयने कार्थी चिदंबरम, आयएनएक्स मीडिया लिमिटेड, या कंपनीचे माजी संचालक इंद्राणी आणि पीटर मुखर्जी, चेस मॅनेजमेंट सर्व्हीसेस लिमिटेड, अॅडव्हांटेज  स्ट्रॅटजिक कन्सलटिंग यांच्या विरोधात फसवणूक, भ्रष्टाचार आणि कारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी आयएसएक्स मीडियाच्या एफआयपीएल प्रस्तावाला मंजुरी दिली असा आरोप सीबीआयने केला आहे. एफआयआरमध्ये पी.चिदंबरम यांचे नाव नसल्याचे सूत्रांनी सांगितले. फक्त अर्थमंत्रालयाचे अज्ञात अधिकारी ऐवढेच म्हटले आहे. काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन टर्ममध्ये चिदंबरम यांनी देशाचे अर्थमंत्री आणि गृहमंत्रीपद भूषवले आहे. 
 
 
काय म्हणाले चिदंबरम 
 
केंद्र सरकार सीबीआय आणि अन्य सरकारी यंत्रणांचा वापर करुन मला, माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना लक्ष्य करत आहे. सरकारला माझा आवाज बंद करायचा आहे. मला लेखन करण्यापासून सरकारला रोखायचे आहे. यापूर्वी विरोधीपक्ष, पत्रकार, स्तंभलेखक आणि एनजीओंची जशी कोंडी केली तशी त्यांना माझी कोंडी करायची आहे असे चिंदबरम म्हणाले. 
 
दरम्यान काँग्रेसनेही चिदंबरम यांचा बचाव केला आहे. चिदंबरम यांनी काहीही चुकीचे केलेले नसून हे छापे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत असे काँग्रेस नेते के.आर.रामासामी म्हणाले. मागची तीन वर्ष तुम्ही काय करत होता ?. तुमच्याकडे पुरावे असतील तर सिद्ध करा. तुम्ही प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहात. भारतातील जनता हे सर्व बघत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडाक्कन यांनी या छाप्यांवर दिली. 
 
 

Web Title: Printed on Chidambaram's house by Indrani-Peter Mukherjee's company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.