पाकमधल्या बनावट नोटांच्या प्रिंटिंग प्रेस होणार बंद
By admin | Published: November 9, 2016 11:00 PM2016-11-09T23:00:36+5:302016-11-09T23:00:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र यानंतर पाकिस्तानमधून येणा-या काळा पैशालाही चाप लागणार आहे. 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानं पाकिस्तानमधली बनावट नोटा बनवण्याची प्रिंटिंग प्रेस आता बंद होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या धाडसी पावलाचं स्वागत करताना किरेन रिजिजू म्हणाले, मोदींच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळा पैशावर नियंत्रण मिळवणं सोपं जाणार आहे. तसेच दहशतवाद्यांना मिळणारा निधी आणि बनावट भारतीय नोटांनाही यामुळे प्रतिबंध करण्यास मदत होणार आहे.
"500 आणि 1000च्या जुन्या नोटा अवैध झाल्यानं आता कराची आणि पेशावरमधल्या बनावट नोटा बनवणा-या प्रिंटिंग प्रेस बंद होतील. या नोटा सुरक्षा एन्जसीसाठी डोकेदुखी बनल्या होत्या. त्यामुळे आता देशाबाहेरून येणा-या काळा पैशाला प्रोत्साहन मिळणार नाही", असंही रिजिजू म्हणाले आहेत.