कारागृहात तुरुंग प्रशासनाने कैद्यांसाठी आयोजित केला 'कैबरे डान्स'...
By admin | Published: January 28, 2016 04:54 PM2016-01-28T16:54:51+5:302016-01-28T17:01:37+5:30
कर्नाटक मधील विजयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगताना चांगली वागणूक असलेल्या ३८ कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने कैबरे डान्सचे आयोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत,
विजयपूर - कर्नाटक मधील विजयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगताना चांगली वागणूक असलेल्या ३८ कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने कैबरे डान्सचे आयोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी तुरुंग प्रशासनाने मुंबईवरुन खास २ डान्स गर्ल्सला बोलवले होते. दरम्यान, आयटम डान्सचे आयेजन करणाऱ्या ३ अधिकाऱ्यांना तुरुंग महासंचालक के सत्यनारायण यांनी निलंबित केले आहे.
हा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित कैद्यांनी गाण्यावर ताल धरला तर काहींनी डान्स करणाऱ्या मुलींवर पैसे उधळले. या डान्सच्या कार्यक्रमापूर्वी दुपारी तीन वाजता प्रजासत्ताक दिनाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून या डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या धक्कादायक घटनेनंतर समजल्यानंतर तुरुंग प्रशासनावर तीव्र टीका करण्यात येत आहे. डान्सचा कार्यक्रम सुरू असताना प्रभारी तुरुंग अधीक्षक पी.एस.आंबेकरही उपस्थित होते. याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.