कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला पकडले
By admin | Published: June 1, 2016 12:44 AM2016-06-01T00:44:02+5:302016-06-01T00:44:02+5:30
जळगाव: गेल्या आठवड्यात कारागृहातून पलायन केलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून ताब्यात घेतले. रात्री त्याला जळगावात आणण्यात आले. दरम्यान, त्याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव जिल्हा पेठ व बोदवड पोलीस स्टेशन आदी ठिकाणचे तीन पथके तैनात केली होती.
Next
ज गाव: गेल्या आठवड्यात कारागृहातून पलायन केलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून ताब्यात घेतले. रात्री त्याला जळगावात आणण्यात आले. दरम्यान, त्याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव जिल्हा पेठ व बोदवड पोलीस स्टेशन आदी ठिकाणचे तीन पथके तैनात केली होती.आरोपी सुधाकर हा बोदवड जंगलात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली होती, त्यानुसार चंदेल यांनी सहायक निरीक्षक राहूल वाघ, सहायक फौजदार मुरलीधर अमोदकर, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, इद्रीस पठाण, विलास पाटील व विनोद पाटील आदींचे पथक बोदवडला रवाना केले. ज्या जंगलात तो लपून बसला होता, तेथे पथक पोहचताच त्याने पळ काढला, मात्र या पथकातील काही कर्मचारी चहूबाजूने तैनात होते तर काही जणांनी त्याचा पाठलाग केला. पळून जाण्यास तो अपयशी ठल्याने शेवटी तो जाळ्यात अडकलाच.