Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:50 PM2022-03-24T14:50:08+5:302022-03-24T14:50:28+5:30

Prisoner Cracked IIT Exam: बिहारच्या एका तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुण कैद्याने दोनवेळा IIT एंट्रंस परीक्षा पास केली. गेल्यावर्षी त्याने संपूर्ण देशात 34वा आणि यंदा 54वा रँक मिळवला.

Prisoner Cracked IIT Exam: Prisoner jailed for murder passes IIT exam, ranks 54th in India | Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

Next

नवाडा(बिहार): असं म्हणतात की मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर प्रत्येक अडचणीवर सहज मात करता येते. कारागृहातील एका तरुण कैद्याने अशक्य अशी गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. खुनाच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सूरज कुमार उर्फ ​​कौशलेंद्रने आयआयटीची मास्टर्स (जेएएम) संयुक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आयआयटी रुरकीने(IIT Rurkee) घेतलेची परीक्षा त्याने फक्त पासच केली नाही, तर परीक्षेत संपूर्ण भारतातून 54वा क्रमांक पटकावला.

सूरज हा वारिसालीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मोस्मा गावचा रहिवासी असून एका खुनाच्या गुन्ह्यात तो जवळपास एका वर्षापासून तुरुंगात आहे. नवाडातील कारागृहात असताना त्यांने या खडतर परीक्षेची तयारी केली. तुरुंग प्रशासनाने त्याला परीक्षेच्या तयारीसाठी खूप मदत केली. तुरुंगात असताना कठोर परिश्रम आणि स्वतःला अभ्यासात झोकून देऊन ही अवघड अशी परीक्षा उतीर्ण मोठे यश मिळवले.

एप्रिल 2021 पासून तुरुंगात
खुनाच्या आरोपाखाली सूरज एप्रिल 2021 पासून तुरुंगात आहे. नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज ब्लॉकमधील मोस्मा गावात दोन कुटुंबांमध्ये रस्त्याच्या वादावरुन जोरदार भांडण झाले होते. एप्रिल 2021 रोजी झालेल्या हल्ल्यात संजय यादव गंभीर जखमी झाले आणि पाटणा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताचे वडील बासो यादव यांनी सूरज, त्याचे वडील अर्जुन यादव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. 19 एप्रिल 21 रोजी पोलिसांनी सूरजसह चार जणांना अटक करून तुरुंगात पाठवले, तेव्हापासून सूरज तुरुंगात आहे.

गतवर्षीही यश मिळाले पण तुरुंगात गेल्याने प्रवेश घेता आला नाही
विशेष म्हणजे सूरजने गेल्या वर्षीही ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि संपूर्ण भारतात 34वा क्रमांक मिळवला होता, मात्र अखेरच्या क्षणी तो या खुनाच्या कचाट्यात अडकला. तुरुंगात गेल्यावरही सूरजचा उत्साह कमी झाला नाही आणि आज पुन्हा तुरुंगात असतानाच त्याने हा पराक्रम केला आहे. जाहीर झालेल्या निकालात सूरजला संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळाला आहे. यासह, तो आता आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश घेऊन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू शकणार आहे. सूरजच्या या यशाबद्दल सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
 

Web Title: Prisoner Cracked IIT Exam: Prisoner jailed for murder passes IIT exam, ranks 54th in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.