पाच कर्मचार्यांवर कारवाईचे संकेत कैदी पलायन प्रकरण : उपमहानिरीक्षकांकडून कारागृहात झाडाझडती
By admin | Published: June 1, 2016 08:54 PM2016-06-01T20:54:36+5:302016-06-01T20:54:36+5:30
जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून तेव्हाच नेमकी काय कारवाई करायची याचे स्वरुप ठरवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बुधवारी ते जळगावला आले होते. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांना चांगलेच फैलावर घेतले.
Next
ज गाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून तेव्हाच नेमकी काय कारवाई करायची याचे स्वरुप ठरवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बुधवारी ते जळगावला आले होते. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांना चांगलेच फैलावर घेतले.गेल्या आठवड्यात सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याने कारागृहाची भिंत ओलांडून पलायन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून त्याला ताब्यात घेतले.न्यायालयात हजर केल्यानंतर बुधवारी त्याला दुपारी साडे तीन वाजता कारागृहात नेण्यात आले.कैद्याची केली चौकशीधामणे हे औरंगाबाद येथून संध्याकाळी सव्वा पाच वाजता जिल्हा कारागृहात आले व सहा वाजता ते कारागृहाचे बाहेर पडले. या चाळीस मिनिटाच्या काळात त्यांनी पलायन केलेल्या कैद्याची चौकशी केली. तू मुख्य दरवाजातूनच बाहेर गेला असे त्यांनी त्याच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मी भिंतीवरून गेलो असे सांगितले. यावेळी धामणे यांनी कैदाला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. तो भिंतीवर कसा चढला हे जाणून घेतले. यावेळी त्यांनी कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्यासह कर्मचार्यांची झाडाझडती घेतली. दरम्यान, भिंतीवरून उडी मारल्यामुळे पायाला मुका मार लागल्यामुळे या कैद्याला आता चालताना त्रास होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.नावे सांगण्यास नकारया प्रकरणात दोषी आढळलेल्या कर्मचार्यांची नावे सांगण्यास धामणे यांनी नकार दिला, अधिकार्यांवरही कारवाई होणार का? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. खात्यांतर्गत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावरच नावेही स्पष्ट होतील, यात नावे कमी जास्तही होऊ शकतात, असेही ते म्हणाले.तीनशे कर्मचार्यांची भरतीकारागृहात रिक्त असलेल्या जागा भरण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. मराठवाडा व खान्देश उपविभागात १८ कारागृह येतात. त्यात सुरक्षा रक्षकांची २०१ व अधिकार्यांची ८९ पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. दरम्यान, कैदी पलायनाच्या पार्श्वभूमीवर धामणे यांनी अधिकारी व कर्मचार्यांना घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.