हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 08:42 AM2019-04-28T08:42:45+5:302019-04-28T08:43:27+5:30
हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे शनिवारी एक बस खोल दरीत कोसळली.
शिमलाः हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे शनिवारी एक बस खोल दरीत कोसळली. या अपघातात मृतांची संख्या 8वरून 12वर गेली असून, अनेक जण जखमी आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधल्या पठाणकोट-डलहौजी मार्गावर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. चंबाची एसपी डॉक्टर मोनिका हिने या घटनेची खात्री केली आहे.
#UPDATE SP Chamba, Dr Monika: Death toll rises to 12. #HimachalPradeshhttps://t.co/lMesU4BXHM
— ANI (@ANI) April 27, 2019
डॉ. मोनिका यांच्या मते, पठाणकोट-डलहौजी मार्गावर एक खासगी बस शनिवारी बनिखेतच्या खोल दरीत कोसळली. दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. डीएसपी डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम या घटनेचा तपास करत आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवणं आणि पीडितांना हरेक प्रकारची मदत करण्याचं आदेश दिले आहेत.
SP Chamba, Dr Monika: A private bus on Pathankot- Dalhousie route fell into a gorge at Panchpulla near Banikhet, today. 8 people died in the incident. Police team led by DSP Dalhousie investigating. #HimachalPradeshpic.twitter.com/9kA33nQ6U2
— ANI (@ANI) April 27, 2019
तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर योग्य उचपार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तत्पूर्वी जानेवारीमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये एक बस खोल दरीत कोसळली होती. ही घटना सिरमौर जिल्ह्यातील खडकोली भागात घडली होती. ज्यात सहा शाळेच्या मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता.
#UPDATE SP Chamba, Dr Monika: Death toll rises to 12. #HimachalPradeshhttps://t.co/lMesU4BXHM
— ANI (@ANI) April 27, 2019