खासगी संस्थाही सुरू करणार पॉलिटेक्निक; एआयसीटीईची कठोर अटींसह परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:18 AM2022-03-30T05:18:31+5:302022-03-30T05:18:46+5:30
कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम ८ अन्वये ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनी म्हणून नोंदणीकृत कंपनीला सार्वजिनक खासगी भागीदारीनुसार पाॅलिटेक्निक सुरू करतात येतील.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : आता खासगी क्षेत्रातील संस्थाही पाॅलिटेक्निक सुरू करू शकतात. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने मंगळवारी सायंकाळी उशिरा एका बैकठीत या कठोर अटींसह या प्रस्तावाला मंजुरी दिली. यात परंपरागत, नवीन, विविध तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातील.
ज्या कंपन्यांची गेल्या तीन वर्षातील उलाढाल ५ हजार कोटी रुपयांची आहे, त्याच कंपनी, कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम ८ अन्वये ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनी म्हणून नोंदणीकृत कंपनीला सार्वजिनक खासगी भागीदारीनुसार पाॅलिटेक्निक सुरू करतात येतील.
याशिवाय २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक संस्था चालविणारी (कमीत कमी एक हजार विद्यार्थी) कोणतीही धर्मादाय संस्था पॉलिटेक्निक सुरू करू शकतील.
मराठीत अभियांत्रिकी
एआयसीटीईने गेल्या वर्षभरात १९ विद्यापीठ किंवा संस्थांना दहा राज्यांत हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तामिळ आणि तेलगू या सहा भारतीय भाषेत २६ तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.