मतदान करण्यासाठी 'ती' युरोपातून भारतात आली; मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 03:17 PM2019-05-19T15:17:06+5:302019-05-19T15:17:49+5:30
देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ही महिला युरोपमधून थेट उत्तर प्रदेशातील मऊ याठिकाणी पोहचली.
मऊ - लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारही उत्सुकतेने घराबाहेर पडत आहे. मात्र उत्तर प्रदेशातील मऊ येथे एका प्रकार समोर आला आहे ज्याठिकाणी मतदान करण्यासाठी एक महिला चक्क युरोपवरुन भारतात आली. देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ही महिला युरोपमधून थेट उत्तर प्रदेशातील मऊ याठिकाणी पोहचली.
मऊच्या घोसी लोकसभा जागेसाठी प्रिया नावाची ही महिला युरोपातून मतदान करण्यासाठी आली. मतदानानंतर तिने माध्यमांशी केलेल्या संवादामध्ये मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी भारतात आल्याचं सांगितले. ज्या हातात देश मजबूत आहे त्यांना हातांना साथ देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आज नरेंद्र मोदींमुळे जगभरात भारताला सन्मान मिळाला असून जगात देशाचं योगदान वाढविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं प्रियाने सांगितले.
वाराणसी एअरपोर्टला उतरुन प्रिया सिंह या आपल्या भावासोबत मऊ येथे गाडीने पोहचल्या. प्रिया स्वीडनमध्ये तिचे पती विजय विक्रम यांच्यासोबत राहते. विजय विक्रम हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
आज लोकसभेच्या सातवा म्हणजे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यात देशातील 59 लोकसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यामध्ये वाराणसी, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बासगांव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाजीपूर, चंदौली, मिर्जापूर आणि राबटर्सगंज लोकसभा मतदारसंघावर निवडणुकीसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.