Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी भाजप कार्यकर्त्यांवर केली पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:14 PM2022-02-22T22:14:54+5:302022-02-22T22:18:38+5:30
UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन परतत असताना कार्यकर्त्यांनी प्रियंकांना पाहून घोषणा सुरू केल्या, त्याला प्रियंका गांधींनी पुष्पवृष्टीने प्रत्युत्तर दिले.
हरदोई: बुलंदशहरनंतर आता उत्तर प्रदेशातील हरदोईमधूनही राजकारणाचे सुंदर चित्र समोर आले आहे. काँग्रेस सरचिटणीस आणि यूपी प्रभारी प्रियांका गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी केली. प्रियांका गांधी यांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. प्रत्युत्तर म्हणून प्रियांकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान, त्यांनी भाजपचे मंडल अध्यक्ष कमल आणि विपिन यांच्याशी हस्तांदोलनही केले. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.
ये वीडियो यूपी के माहौल को स्पष्ट करने के लिए काफी है। pic.twitter.com/gNvJgDwDah
— Youth Congress (@IYC) February 22, 2022
दोन्ही सभांचा मार्ग एकच होता
सोमवारी प्रियंका गांधी यांचा कार्यक्रम मधुगंज शहरातील पोलीस स्टेशनसमोरील मैदानात होता. त्या लखनौहून दुपारी 12:55 वाजता माधौगंजला पोहोचणार होत्या. वाटेत मल्लवन शहरात सीएम योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रमही होता. दोन्ही सभांकडे जाणारा रस्ता एकच होता. सीएम योगी आणि प्रियंका यांच्या स्थळामध्ये सुमारे 8 किलोमीटरचे अंतर होते. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम 1 वाजता होता. त्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांचा कार्यक्रम थोडा उशिरा झाला. दुपारी 1.45 वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले.
उत्तर प्रदेश में बदल रहे हैं हालात, भाजपा समर्थक भी चल रहे हैं कांग्रेस के साथ।
— Youth Congress (@IYC) February 22, 2022
कांग्रेस के हाथ पर जनता को विश्वास है।#BJPseUPbachaopic.twitter.com/IlEDBECGZJ
भाजप कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून कार्यकर्ते परतत होते. त्यानंतर बंगारामू ते मल्लवनला जाताना त्यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतली. प्रियंका मधुगंज सभेसाठी जात होती. यादरम्यान मल्लावन शहरात येणारे फरहत नगर रेल्वे स्टेशनचे क्रॉसिंगही बंद करण्यात आले. यावेळी मोठा ट्रॅफिक जाम झाला होता. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या, त्या प्रत्युत्तर म्हणून प्रियांका गांधींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
प्रियांकांनी जयंत आणि अखिलेश यांचाही सामना केला
यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो दरम्यान सपा नेते अखिलेश यादव आणि आरएलडी नेते जयंत चौधरी यांच्याशी सामना झाला होता. तिन्ही नेते बुलंदशहरमध्ये रोड शो करत होते. त्यावेळीही प्रियांकाने दोन्ही नेत्यांना हात जोडून अभिवादन केले. अखिलेश आणि जयंत यांनीही प्रियांकाचे दोन्ही हात वर करुन अभिवादन स्वीकारले. यावेळी एका बाजूने अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे प्रियंका गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.