Mucormycosis च्या इंजेक्शनच्या कमतरतेवरून प्रियंका गांधींची पंतप्रधानांकडे मागणी; म्हणाल्या, "या दिशेने..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:10 PM2021-06-04T16:10:36+5:302021-06-04T16:12:52+5:30
Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी साधला पतप्रधानांवर निशाणा. सध्या देशात ब्लॅक फंगसच्या आजाराचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणू संदर्भातील प्रकरणांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. ऑक्सिजनचं प्रकरण असेल किंवा लसींची कमतरता प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. सध्या देशातील परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. असं असलं तरी आता ब्लॅक फंगस (Mucormycosis) हा आजार जोकं वर काढून लागला आहे. यासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स सहजरित्या उपलब्ध होणं आणि आयुष्यमान योजनेअंतर्गत त्याचा समावेश करण्याची मागणी प्रियंका गांधी यांनी मोदींकडे केली आहे.
"म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis, ब्लॅक फंगस) इजेक्शनची मागणी वाढत आहे. या संकटात प्रत्येक वेळी आपल्याला औषधांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. जबाबदार कोण आहे? इंजेक्शन महागडं आहे, आयुष्यमान योजनेत कव्हर होत नाही. मोदीजी, कृपया या दिशेनं त्वरित पावलं उचला," असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे. यासोबबतच त्यांनी एक आवश्यक अपील असं म्हणत मागण्याही जोडल्या आहेत.
म्यूकोर माइकोसिस (ब्लैक फंगस) के इंजेक्शन को लेकर गुहार मची हुई है।’दुनिया का दवाखाना’ की उपलब्धि होने के बाद भी हमें इस आपदा में बार-बार दवाइयों की कमी हुई है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 4, 2021
ज़िम्मेदार कौन है?
इंजेक्शन महँगा है, आयुष्मान योजना में कवर नहीं होता।
मोदीजी, कृपया इस दिशा में तुरंत कदम उठाइए। pic.twitter.com/bnc868diy7
लसीकरण मोहिमेवरूनही साधला होता निशाणा
प्रियंका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. कोरोना विरोधी लसीकरणासाठीचा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला गेला? असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी वारंवार कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारला रोखठोक प्रश्न विचारत आहेत.
"मे महिन्यात लस उत्पादन क्षमता ८.५ कोटी. एकूण उत्पादन झालं ७.९४ कोटी आणि लस देण्यात आल्या ६.१ कोटी, सरकारचा दावा आहे की जूनमध्ये १२ कोटी डोस येणार आहेत. पण कुठून? लस उत्पादन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत ४० टक्क्यांची वाढ झालीय का? लसीकरणाचं ३५ हजार कोटींचं बजेट नेमकं कुठे खर्च झालं? अंधेर वैक्सीन नीति, चौपट राजा", असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं होतं.