प्रियंका गांधी घेणार १५० सभा
By admin | Published: July 4, 2016 06:02 AM2016-07-04T06:02:25+5:302016-07-04T06:02:25+5:30
प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे.
मेरठ : प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे. उत्तरप्रदेशात त्यांच्या १५० प्रचार सभा होतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्त्याने सांगितले.
यावेळी त्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारासंघाबाहेर पडून प्रचार करतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या जनसंपर्क
विभागाचे चेअरमन सत्य देव त्रिपाठी यांनी सांगितले. आजवर कोणी पाहिला नाही, असा त्यांचा प्रचार असेल.
उत्तर प्रदेशातील काँग्रेस चांगली कामगिरी करील. त्यांच्या प्रचार कार्यक्रमाला वरिष्ठ
पातळीवर अंतिम रूप देण्यात येत असून, काँग्रेस अध्यक्षा अंतिम
तपशील ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.
ाध्ये होत्या. त्या म्हणाल्या की, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधासभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस अंतिम रणनीती ठरविण्याच्या तयारीत आहे. गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस या निवडणुकीत चांगली कामगिरी करील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. ते अनुभवी नेते आहेत. मागच्या निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. रणनीतीवर अंतिम शिक्कामोर्तब होताच लागलीच प्रचारही सुरू केला जाईल.
>प्रचाराची धुरा
प्रियंका गांधी प्रचाराची धुरा हाती येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमावर अंतिम निर्णय झालेला नाही; परंतु उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात त्यांची मुख्य भूमिका असेल.