ग्रंथपालांनी ओळखली आत्महत्येची ओढणी व लॅपटॉप प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : गणेश भोळे यांची सरतपासणी
By admin | Published: January 12, 2016 11:16 PM2016-01-12T23:16:05+5:302016-01-12T23:16:05+5:30
जळगाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ओळखली. तसेच तिचा औषधीचा डबा, लॅपटॉप व डायरीही त्यांनी ओळखली. भोळे यांची पंच म्हणून साक्ष झाली. ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी भोळे यांची उलटतपासणी घेतली. त्यात त्यांनी पंच म्हणून आपण सहा ते सात ठिकाणी सा केल्या आहेत. डायरीतील मजकूर इंग्रजी व बंगाली भाषेतून होता तो वाचून दाखविला असे त्यांनी सांगितले. बुधवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अंतुर्लीकर व दोन पोलिसांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होणार आहेत. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील काम पाहत आहेत.
Next
ज गाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ओळखली. तसेच तिचा औषधीचा डबा, लॅपटॉप व डायरीही त्यांनी ओळखली. भोळे यांची पंच म्हणून साक्ष झाली. ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी भोळे यांची उलटतपासणी घेतली. त्यात त्यांनी पंच म्हणून आपण सहा ते सात ठिकाणी सा केल्या आहेत. डायरीतील मजकूर इंग्रजी व बंगाली भाषेतून होता तो वाचून दाखविला असे त्यांनी सांगितले. बुधवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अंतुर्लीकर व दोन पोलिसांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होणार आहेत. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील काम पाहत आहेत.दोन पंच फितूरनशिराबाद येथील ट्रक चालक बशीर खान खून खटल्यात मंगळवारी पंच सुनील कोळी व भागवत भरत इंगळे हे फितूर झाले. आपल्यासमोर कोणतेही जप्तीचे काम झाले नसल्याचे इंगळे याने सांगितले.न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. १९ जानेवारी रोजी पुढील कामकाज होणार आहे. पाच साक्षीदारांना समन्स काढण्याचे आदेश देण्यात आले.आरोपीतर्फे ॲड.अकील इस्माईल,ॲड.एस.के.कौल, ॲड.हिंमत सूर्यवंशी व ॲड.प्रवीण पांडे यांनी काम पाहीले.जामीनासाठी अर्जबांभोरी रस्त्यावरील पोदार स्कुलमध्ये २५ लाखाच्या अपहारप्रकरणी दाखल गुन्ात संशयित संतोष मर्दाने याने मंगळवारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने सरकारपक्षाचा खुलासा मागविला आहे.दोघांचे अर्ज फेटाळलेभडगाव पोलीस स्टेशनला दाखल मारहाणीच्या गुन्ात विजय कैलास पाटील व दादा बारकु पाटील या दोघांचे जामीन अर्ज मंगळवारी न्या.ए.के.पटनी यांनी फेटाळून लावले.खुनाच्या गुन्ात अर्ज फेटाळलाआकाश महारु पाटील खून प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल आरोपी मदन दिलीप पाटील याचा जामीन अर्ज न्या.के.पी.नांदेडकर यांनी मंगळवारी फेटाळून लावला. १० सप्टेबर २०१५ रोजी हा गुन्हा दाखल झाला होता.जामीन फेटाळलाअण्णासा वामनसा क्षत्रीय यांच्या आत्महत्येप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ात कैलास रामदास पाटील यांचा जामीन अर्ज न्या.ए.के.पटनी यांनी मंगळवारी फेटाळून लावला. २६ नोव्हेंबर रोजी क्षत्रीय यांनी बांभोरी शिवारातील गोडावूनमध्ये आत्महत्या केली होती. १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.