प्रियंकाला मोटी म्हणून चिडविले जात होते
By admin | Published: October 29, 2015 10:02 PM2015-10-29T22:02:33+5:302015-10-29T22:02:33+5:30
प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : वडिलांनी वाचला साक्षीत छळाचा पाढा
Next
प रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : वडिलांनी वाचला साक्षीत छळाचा पाढाजळगाव: सतत मोटी म्हणून चिडविणे,अंथरुणावर मुद्दाम पाणी टाकणे, बंगाली असल्याने मराठी बोलण्याची सक्ती करणे अशा प्रकारे प्रियंका मुखर्जी हिचा छळ केला जात असल्याची साक्ष प्रियंका मुखर्जी हिचे वडील तथा फिर्यादी डॉ.नयन दिलीप मुखर्जी यांनी गुरुवारी न्यायालयात दिली.गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिने २४ मे २०१४ रोजीच्या मध्यरात्री दीड वाजता महाविद्यालयाच्या वसतीगृहात आत्महत्या केली होती. याबाबत तिच्या सहकारी प्रियंका काबरा, प्रिया पवार व स्नेहल महाजन यांच्याविरुध्द नशिराबाद पोलीस स्टेशनला रॅगिंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. न्या.प्रीतीकुमार घुले यांच्या न्यायालयात या खटल्याला सुरुवात झाली. गुरुवारी प्रियंकाचे वडील नयन मुखर्जी यांनी घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. तिला होत असलेल्या त्रासाचा पाढाच त्यांनी वाचला. यावेळी त्यांनी प्रियंकाने लिहून ठेवलेली सुसाईड नोट ओळखली. ही नोट पाहून त्यांना रडू कोसळले. सरतपासणी घेतल्यानंतर बचाव पक्षाच्या विनंतीवरुन ३० ऑक्टोबर रोजी उलटतपासणी घेण्यात येणार आहे. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील यांनी, सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीकडून ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.इन्फो...एकुलती एक मुलगीडॉ.नयन मुखर्जी यांना प्रियंका ही एकुलती एक मुलगी होती. तिच्या आत्महत्येनंतर मुखर्जी परिवाराने एक महिन्याचे बाळ दत्तक घेतले. नयन मुखर्जी तारखेसाठी जळगावात पोहचल्यावर तिकडे त्यांच्या पत्नीलाही रडू कोसळले. तर नयन यांना न्यायालयात रडू कोसळले. एकमेव व लाडाची मुलगी गेल्याच्या दु:खातून ते अजूनही सावरले नाहीत.