गडकरींशी प्रियंकाच्या मनसोक्त गप्पा!

By admin | Published: September 3, 2014 01:43 AM2014-09-03T01:43:48+5:302014-09-03T17:29:11+5:30

समुद्राची गाज आणि भराभर मागे सरकत जाणा:या लोखंडी सळ्य़ा पाहून एका जागतिक शहरात मी राहते असं जाणवतं. तेव्हा तुम्ही आठवता.!’

Priyanka's passionate chat with Gadkari! | गडकरींशी प्रियंकाच्या मनसोक्त गप्पा!

गडकरींशी प्रियंकाच्या मनसोक्त गप्पा!

Next
राजकारण नव्हे, लोक पसंती करेर्पयत अभिनयच करेन : सीलिंकवरून घरी जाताना तुम्ही आठवता, पुष्पगुच्छ घेऊन प्रियंका गडकरींच्या 13 तीनमूर्ती लेन या निवासस्थानी 
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली 
‘मला तुम्हाला भेटायची खूूप इच्छा होती. जेव्हा मी मुंबईत सी-लिंकवरून घराकडे जाते, तेव्हा ऐकू येणारी समुद्राची गाज आणि भराभर मागे सरकत जाणा:या लोखंडी सळ्य़ा पाहून एका जागतिक शहरात मी राहते असं जाणवतं. तेव्हा तुम्ही आठवता.!’ या वाक्यासरशी तिने गडकरींच्या चेह:याकडे पाहिले. गडकरींनीही मंद स्मित केलं. ते म्हणाले,‘ प्रियंका, राजकारणात येणार का? ती हसली नि उद्गारली- नाही! राजकारण खूप गंभीरपणो करण्याची गोष्ट आहे. जी तुम्ही करता आणि मी अभिनय तेवढय़ाच गंभीरपणो करते. कला ही कलाच आहे.!’ पण आदिवासींच्या विकासासाठी मला काम करायचे आहे, त्याचे मार्गदर्शन तुम्ही करा.’
भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या 13 तीनमूर्ती लेन या निवासस्थानी पोहोचली. नितीनजी, सौ दिन की शुभकामनाऐ.असं ती म्हणाली आणि यानंतर तब्बल दीड तास  राजकारण सोडून जापान, ब्राङिाल, चीन, बँकॉक, अमेरिका ऑस्टेलिया अशी जगभराची मुशाफिरी करीत इतरही विषयांवर मनसोक्त गप्पा रंगल्या. अगदी परस्परांनी मुलाखतच घेतली. ती त्यांच्याच शब्दात-
प्रियांका  : तुम्ही मुंबईसाठी खूप केले, आता काय प्लॅन आहेत?
गडकरी : 55 फ्लायओव्हर बांधले, पुणो- मुंबई रस्ता पूर्ण केला. सीलिंक पूर्ण केले. आता हा सी-लिंक वर्सोवा र्पयत पुढे न्यायचा आहे.
प्रियांका :  म्हणजे मी तिथे घर घेते तोवर पूर्ण होऊ द्या.
गडकरी: हा रेड टी आहे. विदर्भातील अंबाडीची भाजीवर संशोधन करून त्यापासून तयार केला आहे हा चहा. रोजच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो.
प्रियांका: मला सॅम्पल द्या, माङया आईला देते.(एक सॅम्पल दिल्यावर गडकरी तिला भेट देण्यासाठी बांबूची ब्रूफकेस बोलवतात)
गडकरी: ही ब्रूफकेस  विदर्भातील एका सामाजिक संस्थेने बनविली आहे. तू यावर उभी राहिलीस तरी तुटणार नाही. मुकेश अंबानी व रतन टाटा हीच वापरतात. 
प्रियांका : इको फ्रेंडली, स्टर्डी, युनिक म्हणू हिला. दोन दिवसांत ही माङया वेबसाईटवर झळकेल. मी करते हिचे प्रमोशन. आय लव्ह इनोव्हेशन.
गडकरी : इथेनॉलपासून तयार होणारी उत्पादने शेतक:यांच्या हाती चांगला पैसा देतील, यासाठी नियोजन करत आहे. मुले-मुले  केस कापतात, आम्ही त्या केसापासून निर्मिती करून हजारोंना रोजगार मिळवून दिला आहे.(यावेळी त्यांनी सीताफळ आणा असे सांगितले.) ही सीताफळे आम्ही सेंद्रीय पध्दतीने तयार केली. परदेशात ती पाठविली जातील. देशातील सारेच उद्योगपती ती मागवतात. (यादरम्यान भंडा:याची कोसा साडी आणा, अशी  सूचना त्यांनी केली.) प्रिती ङिांटा, हेमामालिनी, लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन नेसतात. आता या साडीला जगात पोहोचवायची आहे. ड्रेसडिझायनर शायना एनसी डिझाइन करत आहेत.
प्रियांका :  मी सावंतवाडीमध्ये शेती घेतली. तिथे प्रयोग करत आहे. 
गडकरी- तुझा नवीन चित्रपट आम्ही सहकुटुंब पाहणार आहोत. प्रेरणादायी चित्रपट मनाला भावतात. किती वर्षे झाली इंडस्ट्रीमध्ये? मराठी चित्रपट करणार की नाही?
प्रियांका:  18 व्या वर्षी मिस इंडिया झाले, 19 व्या वर्षी पहिला चित्रपट. आता नावही नीटसं आठवत नाही. 11 वर्षे झाली बरोब्बर. अजून मराठीची ऑफर नाही आली. 
गडकरी :  किती वर्षे करणार अजून अभिनय?
प्रियांका - नितीनजी, बडा उमदा सवाल. लेकिन जबतक लोक देखना पसंद करोगे..

 

Web Title: Priyanka's passionate chat with Gadkari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.