काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत ISIS च्या समर्थनार्थ घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:16 PM2017-11-20T12:16:01+5:302017-11-20T13:12:11+5:30

जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे

pro islamic state slogans at funeral of slain terrorist in Jammu Kashmir | काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत ISIS च्या समर्थनार्थ घोषणाबाजी

काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत ISIS च्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Next

श्रीनगर - जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. श्रीनगर - गुलमर्ग रोडवरील पारम्पोरा परिसरात दहशतवाद्याला दफन करत असताना जमा झालेल्या लोकांनी इसिस आणि दहशतवादी झाकीर मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. इतकंच नाही, तर यावेळी फुटीरवादी संगटना हुर्रियत कॉन्फरन्स आणि सुरक्षा जवानांविरोधात नारेबाजी करण्यात आली. 

तहरीक-उल-मुजाहिदीनचा दहशतवादी मुगीस अहमद मीरला दफन करत असताना लोकांना 'ना हुर्रियत वाली शरीयत, ना हुर्रियत वाली आजादी, कश्मीर बनेगा दारुल इस्लाम' अशी घोषणाबाजी केली. लष्कर जवानांनी श्रीनगरमधील जकूरा येथे चकमकीदरम्यान मुगीस अहमद मीरला ठार केलं होतं. मुगीस अहमद मीरच्या समर्थकांनी त्याचा मृतदेह इसीसच्या झेंड्यात गुंडाळून अंत्ययात्रा काढली होती. घोषणाबाजीमुळे काश्मीर खो-यात इसिस पाय पसरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

जम्मू काश्मीर पोलिसांनी मात्र राज्यात इसिसचा कोणताही प्रभाव पडला असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. बुरहान वानी ठार झाल्यानंतर झाकीर मुसाला हवं तितकं समर्थन मिळत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. जवानांनी 2016 मध्ये चकमकीदरम्यान बुरहान वानीला ठार केलं होतं. काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितलं आहे की, 'जम्मू काश्मीरमधअये दहशतवादावर इसिसचा नेमका किती प्रभाव आहे याचा तपास आम्ही करत आहोत'.
 

Web Title: pro islamic state slogans at funeral of slain terrorist in Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.