खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 10:50 AM2018-11-29T10:50:18+5:302018-11-29T11:06:01+5:30

नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

Pro-Khalistan leader in Pakistan shares pic with Navjot Singh Sidhu, triggers row in India | खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका  

खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका  

Next
ठळक मुद्देखलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो फोटो सोशल मीडियात व्हायरलनवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धूपाकिस्तान गेले आणि वाद निर्माण झाला, असे कधी झालेच नाही. पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका खलिस्तानी दहशतवाद्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला आहे. 

दिल्लीचे आमदार आणि अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरजा यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धू यांचा फोटो आहे. मनजिंदर सिंह सिरजा यांनी फोटो शेअर करत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना लक्ष्य केले. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 


दरम्यान, बुधवारी पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्ताने पंतप्रधान इम्रान खान यांचे भरभरुन कौतूक केले. तसेच आता गोळीबारी नकोय, प्रेम अन् शांती हवीय. त्यासाठी आपण सर्वांनीच आपले विचार बदलायला हवेत, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले. 


तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही नवज्योतसिंग सिद्धूयांचे तोंडभरुन कौतुक केले. नवज्योतसिंग सिद्धू  हे पाकिस्तानला शांतीचा संदेश घेऊन आले होते. मग, त्यांच्यावर टीका कशासाठी ? नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जर, त्यांनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवली, तरीही ते विजयी होतील, असेही पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले. 


याआधीही नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. 

Web Title: Pro-Khalistan leader in Pakistan shares pic with Navjot Singh Sidhu, triggers row in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.