४४ लाख कर्मचाऱ्यांच्या ईएसआय सेवेत अडचणी; १२00 पदे रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 12:34 AM2018-07-29T00:34:24+5:302018-07-29T00:37:10+5:30

महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे.

Problems with the 44 million employees' ESI services; 1200 posts vacant | ४४ लाख कर्मचाऱ्यांच्या ईएसआय सेवेत अडचणी; १२00 पदे रिकामी

४४ लाख कर्मचाऱ्यांच्या ईएसआय सेवेत अडचणी; १२00 पदे रिकामी

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात ‘ईएसआय’ची १५ रुग्णालये असली तरी शेकडो डॉक्टरांसह एकूण १२00 पदे रिक्त आहेत. राज्य सरकार व ईएसआयच्या वादाचाही सेवेवर परिणाम होत आहे.
राज्याच्या २२ जिल्ह्यांतील या योजनेत ४४ लाख कर्मचाºयांचा समावेश आहे. ईएसआयची १५ रुग्णालये व ५६ दवाखाने आहेत. रुग्णालयांत २0६ डॉक्टर, ३७८ परिचारिका, २५४ निमवैद्यक व ३६३ इतर कर्मचाºयांची पदे रिक्त
आहेत. अन्य १४ जिल्ह्यांतही ९ रुग्णालये आणि ७५ दवाखाने उघडण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या १५ पैकी ३ ईसआय तर १२ रुग्णालये राज्य सरकार चालविते.

रुग्णालयात रिक्त असलेली पदे
पदनाम स्वीकृत नियुक्त्या रिक्त
डॉक्टर ५७१ ३६५ २0६
स्टाफ नर्स ९५६ ५७८ ३७८
निमवैद्यक ५४४ २९0 २५४
व्यवस्थापन ८५६ ४९३ ३६३

Web Title: Problems with the 44 million employees' ESI services; 1200 posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.