‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

By admin | Published: May 11, 2015 03:25 AM2015-05-11T03:25:53+5:302015-05-11T03:25:53+5:30

केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

Problems by becoming 'Team India' | ‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

Next

बर्नपूर (प. बंगाल) : केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
येथील आयआयएससीओच्या आधुनिक पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या देशांसोबतचे मुद्दे ‘टीम इंडिया’च्या भावनेने सोडवले जात असतील तर अंतर्गत मुद्द्यांचे समाधान या माध्यमातून अगदी सहज काढले जाऊ शकते. संसदेने भारत-बांगलादेश भूसीमेशी संबंधित समझोत्याबाबतचे विधेयक सर्वसहमतीने पारित केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह पश्चिम बंगाल, आसाम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी केंद्रासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. यापुढेही टीम इंडियाच्या भावनेने काम केल्यास राष्ट्रीय समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील, असे मोदी या वेळी म्हणाले. मी अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलो. त्यामुळेच राज्यांविषयी केंद्राची भूमिका काय असायला हवी, हे मी जाणतो. आपल्या राज्यघटनेने संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारली आहे. (वृत्तसंस्था)

भारताचा आर्थिक विकास जगात सर्वांत वेगवान
देशात नवे सरकार स्थापन होऊन केवळ एक वर्ष झाले. पण वर्षभरात भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. एक वर्षापूर्वी भारत डुबला. आता तो कधीही वर येऊ शकणार नाही, असे जग समजत होते. पण रालोआ सरकारने गतवर्षभरात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पायाभरणी केली, असा दावाही मोदींनी या वेळी केला.

Web Title: Problems by becoming 'Team India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.