पाण्यासाठी मनपात मोर्चा नितीन साहित्यानगरातील समस्या :बोअरिंगचे पाणी पिण्याच अयोग्य असल्याने हाल
By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:42+5:302016-02-29T22:01:42+5:30
जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना घेराव घातला.
Next
ज गाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना घेराव घातला.यापूर्वीही स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यावेळी पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले होते. मात्र मजिप्राच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सध्याच्या पाईपलाईनवरून पुढे पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. तरीही तात्पुरती उपाययोजना म्हणून पाईपलाईन टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मध्ये असलेल्या शेतमालकाने विरोध दर्शविल्याने ते कामही बंद पडले. पाण्याची तपासणी करणारया परिसरात ज्या बोअरवेलवरून पाणी वापरले जात आहे. ते पिण्या योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणजे आहे. त्यामुळे मनपाने भूजल सर्वेक्षण विभागाला पत्र देऊन पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. जलकंुभाची गरजसुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.