जिल्ह्यातील वाळू गटांवरील उचल बंद आठ दिवसाची प्रक्रिया : जिल्हा प्रशासन करणार संपूर्ण मोजमाप
By admin | Published: April 5, 2016 10:02 PM2016-04-05T22:02:25+5:302016-04-05T22:02:25+5:30
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले.
Next
ज गाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले.जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीला १६ वाळू गटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ८९ लाख ४६ हजार ५०६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यानंतर तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. या दरम्यान काही वाळू ठेकेदारांनी रक्कम न भरल्याने जिल्हाभरात १२ वाळू गटांवरील उचल सुरु होती. स्मॅट प्रणालीचा अवलंब केल्याशिवाय वाळू उचल करू देऊ नये या आशयाची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात टाकण्यात आल्याने काही दिवस वाळू उचल करण्यास स्थगिती देण्यात आली होती.जिल्हा प्रशासनातर्फे स्मॅट प्रणालीचा अवलंब सुरु केल्यानंतर वाळू उचल करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या काळात ठेकेदारांनी किती वाळूची उचल केली याची मोजणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ दिवस वाळू ठेक्यांवरील उचल बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या कालावधीत संबधित तालुक्याचे तहसीलदार हे वाळू गटांची मोजणी करणार आहेत. त्याचा अहवाल तीन ते चार दिवसात अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.इन्फो-बारकोड सिस्टीम सुरु होणारवाळूची उचल करण्यासाठी बारकोड सिस्टीमचा अवलंब करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही सिस्टीम लागू करण्याबाबत नियोजन होते. मात्र वाळू गटांच्या मोजणीनंतर ही सिस्टीम लागू करण्यात येणार असल्याचे गुलाबराव खरात यांनी सांगितले. पुणे येथील शौर्य इन्फोटेक यांना बारकोड सिस्टीमचे काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.