१३ पालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित २४ जून ते १६ ऑगस्ट दरम्यान चालणार प्रक्रिया
By admin | Published: June 17, 2016 11:08 PM2016-06-17T23:08:29+5:302016-06-17T23:08:29+5:30
जळगाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
Next
ज गाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे.जिल्ातील भडगाव, वरणगाव, जामनेर या नगरपालिका वगळता १३ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधित संपत आहे. त्यानुसार या नगरपालिकांची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. २४ जुनपर्यंत मुख्याधिकारी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करतील. त्यानंतर २९ जुनपर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देतील. जिल्हाधिकारी जुनपर्यंत सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करतील. २ जुलै पर्यंत नगरपरिषद, नगरपालिका सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत मुख्याधिकारी काढतील. त्यानंतर ५ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग मार्गदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या आरक्षणाची रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती व सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ ते १४ जुलै दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. २७ जुलै पर्यंत प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी होणार आहे. २ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबधित विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवतील. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. १६ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी प्रभाग निहाय एकुण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकसंख्या आरक्षणासह जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.